स्वतःची कार विकत घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन पैशांची जुळवाजुळव केली जाते. यानंतर अखेर जेव्हा कार विकत घेतली जाते त्यानंतर ही गोष्ट शेजाऱ्यांना, नातेवाईकांना, मित्रांना सर्वांना सांगण्यासाठी आपण उत्सुक असतो. जेव्हा नवीकोरी कार घरी आणली जाते त्यावेळी सर्वांचे लक्ष फक्त कारवरच असावे असे वाटते. असेच काहीसे सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये झालेले पाहायला मिळत आहे. सर्वांचे लक्ष या नव्या कारकडे गेले पण याचे कारण वेगळेच ठरले.
https://twitter.com/veekay122002/status/1578374845636968449?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1578374845636968449%7Ctwgr%5E09a40e5ef012298924724077c6817a7766e59657%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-4526174981495747439.ampproject.net%2F2209142312000%2Fframe.html
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक नवी गाडीचे घरी आणण्यात आल्याचे दिसत आहे. व्हिडीओच्या सुरूवातीला ही कार गेटमधून व्यवस्थित आत येते. पण आत येताच कदाचित चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटते, त्यामुळे कार थेट पार्क केलेल्या दुचाकी गाड्यांवर आदळते आणि पलटते. ही संपुर्ण घटना तिथे असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पाहा हा व्हायरल व्हिडीओ.



