राजगुरूनगर : राजगुरूनगर चास रोडवर असलेले विविध व्यवसायांच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीने प्रामाणिक व दर्जेदार ब्रँड बनलेल्या कलाश्री ग्रुपने नव्याने हॉटेल व्यवसायात पदार्पण केले आहे. हॉटेल कलाश्री नावाने व्हेज नॉनव्हेजच्या खवैयांसाठी लज्जतदार पदार्थांचे भव्य व फमिलीसाठी आनंद देणारे दालन ग्राहकांच्या पसंतीस पडेल, अशी खात्री सातकरस्थळच्या लोकनियुक्त सरपंच संजीवनी थिगळे यांनी व्यक्त केली.
राजगुरूनगर शहरालगत सातकरस्थळ पश्चिम येथे दसऱ्याच्या मुहूर्तावर बुधवारी (दि. ५) कलाश्री हॉटेलचे उद्घाटन सरपंच थिगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी शुभेच्छा देताना त्या बोलत होत्या. तसेच मराठमोळ्या संस्कृतीसह सहकुटुंब पाहुणचार घेण्यासाठी घरगुती जेवणाचा आस्वाद घ्यावा असे हे ठिकाण आहे. त्याचबरोबर पाचारणे बंधूंनी आपल्या उद्योग व्यवसायात अनेक पैलू दाखविले आहेत. त्यात आता खास दैनदिन गरजेचे खवय्यांसाठी नवीन सेवा देण्यात मोठा वाटा घेतला आहे. त्यांना या व्यवसायात प्रगती करून व्यवसाय वाढवावा अशा शुभेच्छा दिल्या.
खेडचे पोलीस निरीक्षक सतीशकुमार गुरव, सातकरस्थळचे माजी सरपंच अजय चव्हाण, आशिष थिगळे, विकास थिगळे, तिन्हेवाडीचे सदस्य संतोष पाचारणे, जिल्हा बँकेचे निवृत्त अधिकारी बाळासाहेब देवदरे, दिलीप पाचारणे, पोलीस अधिकारी घोलप, पांडुरंग पांडुरंग सांडभोर, भाऊसाहेब आरुडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. राजगुरूनगर बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र सांडभोर, गणेश थिगळे, धनंजय कहाणे, समीर आहेर, तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक रंगनाथ आरुडे, दत्तात्रय शिवले यांनी शुभेच्छा दिल्या.




