पुणे : राज्यात काही भागात परतीचा पाऊस कोसळत आहे. या परतीच्या पावसामुळं अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच या पावसाचा शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. पुणे जिल्ह्यात पुणे पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. परतीच्या पावसामुळे शहरात अनेक सकल भागात पाणी साचल्यामुळे संपूर्ण शहर जलयुक्त शिवार सारखे दिसत आहे.

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजपासूनच परतीचा मान्सून माघारी फिरणार आहे. त्यामुळं उद्यापासून (15 ऑक्टोबर) राज्यात उघडीपीची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यात पावसाची शक्यता नाही. मात्र, सध्या मुंबईसह ठाणे, पुणे जिल्हा परिसरात ढगाळ वातावरण असून जोरदार पाऊस सुरी आहे.




