मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीस नावाचा अर्थ सांगितला आहे. राज ठाकरे यांनी फडणवीस नावासोबतच चिटणीस, पारसणीस या दोन्ही नावाचे अर्थ देखील सांगितले आहे. हर हर महादेव या चित्रपटाच्या निमित्ताने राज ठाकरे यांची मुलाखत आयोजित केली होती. अभिनेते सुभोध भावे यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे.
यावेळी राज ठाकरे यांनी मुलाखतीत काही नावांचा उल्लेख करत त्यांची नावे कशी पडली ? त्या नावांचा अर्थ काय ? याबद्दल राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलंय. राज ठाकरे म्हणाले, चिटणीस हे नाव जे चिठ्ठी लिहायचे त्यांचे नाव चिटणीस झाले आहेत. पारस नविस म्हणजे पर्शियन लिहिणारा त्याचे नंतर पारसनीस झाले. तसे फडणवीस या शब्दाचा अर्थही सांगितला. फड म्हणजे फळा, फळ्यावर लिहिणारा फडणवीस. असं राज ठाकरे म्हणाले.



