मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी अनेक आमदार इच्छुक आहेत. पहिल्या विस्तारात स्थान न मिळालेल्या नेत्यांनी दुसऱ्या विस्ताराकडे आस लावून बसले आहेत. मात्र मंत्रिमंडळ कधी होणार याबाबत अद्यापही ठोस सांगितले जात नाही. त्यातच मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार रखडल्याने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे. आमदार किशोर पाटील नाराज असल्याच्या बातम्यासमोर आल्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार किशोर पाटील म्हणाले की, मला अजून सूत्र कळाले नाही. हे सूत्र कुठून येते? मी कधीही नाराज नव्हतो. मी स्वत:ला मुख्यमंत्री समजतो, हे मंत्री काय करता? निश्चित मी मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. परंतु माझी नाराजी नव्हती. आजही नाही आणि उद्याही राहणार नाही. संधी मिळाली तर नक्कीच त्याचं सोने करेन. मला जो विभाग मिळेल त्यामाध्यमातून राज्याच्या हिताचे निर्णय घेईन पण मी नाराज नाही एवढं नक्की असा खुलासा त्यांनी केला.



