मुंबई – केंद्रीयमंत्री नारायण राणे सातत्याने ठाकरे कुटुंबावर टीका करत आहेत. अनेकदा ते आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत हिन भाषेत टीका करताना दिसतात. मात्र, आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नारायण राणेंना थेट फिरकी घेतली.
काय म्हणाले नारायण राणे…..
राणे म्हणाले की, शिवसेनेचा गट कुठं राहिला? शिवसेना ५६ वरून ५-६ वर आली आहे. त्यातील काहीजण माझ्या संपर्कात असल्याचं राणे यांनी म्हटलं होतं. राणे यांच्या या टीकेवर आदित्य ठाकरे म्हणाले की, त्यांना मागील १६ वर्षांची सवयच आहे. त्यांनी मंत्री म्हणून केलेलं एक तरी चांगलं काम दाखवाव. चार पक्षात जावून त्यांनी एकही काम केलं नाही. जाऊद्या राणे यांनी त्यांच्याकडे असलेल्या मंत्रीपदाचा किमान फुलफॉर्म सांगावा, असं थेट आव्हान देत आदित्य ठाकरे यांनी राणेंची लायकी काढली.



