पुणे : पुणे ते बंगळुरू हे अंतर 842.1 किमी आहे आणि सध्या या महामार्गावरून प्रवास करण्यासाठी सुमारे 14 ते 15 तास लागतात. मात्र या प्रकल्पामुळे पुणे/मुंबई आणि बेंगळुरू दरम्यानच्या प्रवास 95 किमी इतका कमी होईल. पुणे रिंगरोडवरील कांजळे ते बेंगळुरूमधील सॅटेलाइट रिंग रोडवरील मुथागडहल्लीपर्यंत हा एक्स्प्रेस वे बांधण्यात येणार आहे.
मुंबई ते बेंगलोर महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे. केंद्र सरकार नवा पुणे बेंगलोर हायवे बनवण्याच्या तयारीत असून या हायवेच्या माध्यमातून आपला प्रवास अतिशय सुखकर आणि जलद होणार आहे. पुणे-बेंगळुरू एक्स्प्रेस वे प्रकल्पासाठी अंदाजे 50,000 कोटी रुपये खर्च होणार असून हा महामार्ग तब्बल 12 जिल्ह्यातून जाणार आहे. या नव्या प्रोजेक्ट नंतर मुंबई ते बेंगलोर अंतर केवळ 5 तासात पूर्ण होऊ शकणार आहे.
12 जिल्ह्यातून जाणार नवा एक्स्प्रेस वे
हा नवा एक्स्प्रेस पुणे बेंगलोर वे एकूण १२ जिल्ह्यातून जाणार आहे ज्यामध्ये कर्नाटकातील 9 आणि महाराष्ट्रातील 3 जिल्ह्याचा समावेश. बंगळुरू ग्रामीण, बेलागावी, बागलकोट, गदग, कोप्पल, विजयनगर (बल्लारी), दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमाकुरू, पुणे, सातारा आणि सांगली अशी या जिल्ह्यांची नावे आहेत. आत्तापर्यंत, प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झालं असून प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. हा एक्सप्रेसवे बांधण्यासाठी अंतिम ब्लू प्रिंट डिसेंबर 2022 मध्ये NHAI कडे सादर केली जाईल.



