मुंबई : मंत्रिपद आणि ५० खोकेचा आरोप यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून बच्चू कडू यांची नाराजी जगजाहीर आहे. रवी राणांसोबत झालेला त्यांचा वाद तर अगदीच ताजा आहे. हीच नाराजी दूर करण्यासाठी आता शिंदे फडणवीस सरकारकडून त्यांना ५०० कोटींचं गाजर दाखवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
बच्चू क़डू यांच्या अचलपूर या मतदारसंघात सपन प्रकल्प होत आहे. या प्रकल्पाला ४९५.२९ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. याला आजच्या बैठकीत मान्यता देण्यात येणार आहे. आता यामुळे बच्चू कडू यांची नाराजी दूर होणार का अशी चर्चा सध्या सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याचा उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार आणि वारंवार होणारे ५० खोके असे आरोप यामुळे बच्चू कडू नाराज असल्याचं जाहीरपणे दिसत होतं. त्यांनी याविषयी वारंवार तक्रार केली होती. यानंतर आपल्याच फोननंतर कडूंनी आपल्याला पाठिंबा दिला, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी यावर दिलं होतं.


