नवी दिल्ली – मुंबई उच्च न्यायालयाचे नाव बदलून महाराष्ट्र हायकोर्ट करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ही याचिका माजी न्यायाधीश व्ही. पी. पाटील यांनी दाखल केली होती. मात्र, न्या. अनिरुद्ध बोस आणि न्या. विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
माजी न्यायाधीश व्ही. पी. पाटील हे २६ वर्षे न्यायाधीशपदी होते. मुंबई उच्च न्यायालयाचे नाव महाराष्ट्र हायकोर्ट करा, अशी मागणी केली होती. मात्र पुढे त्याला रेड सिग्नल दाखवत जुने बॉम्बे हायकोर्टाचे नाव बदलण्यास नकार दिला आहे.


