नाशिकमधून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ आज सकाळीं बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले असून व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. आज संध्याकाळीचं रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचे माहिती आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. असे असताना आज राष्ट्रवादीचे दुसरे नेते छगन भुजबळ याना देखील आज अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ते गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमात मास्क वापरत असल्याचे दिसून येत होते. आज अस्वस्थ वाटू लागल्याने तसेच दिवसांपासून व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. आज संध्याकाळीचं रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचे माहिती आहे.



