पुणे, दि. 11 – विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) 26 मार्च रोजी घेण्यात आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेने राज्य शासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) आयोजित करण्यात येते. यंदाची 38 वी परीक्षा ही 26 मार्च रोजी घेण्यात येणार असून, यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
उमेदवारांनी विद्यापीठाच्या सेट विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहे. विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत 1 ते 7 डिसेंबर अशी असणार आहे. सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर भेट द्यावी, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.



