डेहराडून– रामदेवबाबांची प्रसिद्ध औषध उत्पादन कंपनी असलेल्या दिव्या फार्मसी कंपनीतर्फे उत्पादीत केल्या जाणाऱ्या उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलस्ट्रॉल या व्याधींवरील पाच औषधांवर उत्तराखंड सरकारने बंदी घालण्याचा आदेश दिला होता. परंतु हा आदेश आज चार दिवसांनंतर मागे घेण्यात आल्याची माहिती उत्तराखंड सरकारच्या आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरणाने दिली आहे.
हा आदेश घाई गडबडीत काढला गेला होता, तो जारी करण्यापूर्वी संबंधित कंपनीला त्यांची बाजु मांडण्याची संधी दिली गेली नव्हती अशी सारवासारव आता या विभागाने केली आहे.



