मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. कोविडच्या काळात विद्यार्थ्यांना काही सुट देण्यात आल्या होत्या ज्यात,शाळा तिथे परीक्षा केंद्र, वाढीव वेळ, अभ्यासक्रम मधील कपात. मात्र यंदा या सवलती रद्द करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली होती. यंदा परिस्थिती पूर्वपदावर आल्याने या सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. यंदाची परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असेल तर राज्य मंडळाच्या नियोजनानुसार येणाऱ्या परीक्षा केंद्रावर परीक्षा द्यावी लागेल तर परीक्षेच्या दरम्यान अतिरिक्त वेळही दिला जाणार नाही.



