नवी दिल्ली : ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी ट्विटरची ब्लू व्हेरिफिकेशन प्रक्रिया २ डिसेंबरपासून सुरू होईल, अशी माहिती दिलेली आहे. सरकारी कार्यालयांसाठी सोनेरी, कंपन्यांसाठी राखाडी आणि व्यक्तींसाठी निळा अशा रंगाचे हे व्हिरिफेकशन टिक असतील, असे त्यांनी म्हटले आहे.
मस्क यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सर्व व्हेरिफिकेशन अकाऊंटची खातरजमा ट्विटर प्रत्यक्षात करणार आहे, त्यानंतरच या टिक उपलब्ध होतील. या प्रक्रियेला वेळ लागेल, पण ती आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटलेले आहे.
ट्विटरवर व्हेरिफाईड अकाऊंटसाठी ८ डॉलर इतकी रक्कम आकारण्याचा निर्णय एलन मस्क यांनी यापूर्वीच जाहीर केला आहे. ही सेवा सुरू केल्यानंतर अनेक खोट्या अकाऊंटने ब्लू टिक मिळवण्यास सुरुवात केली, त्यानंतर ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आली.




