हुबळी : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज सीमाभागातील जनतेच्या जखमेवर पुन्हा एकदा मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्यासाठी सीमाप्रश्न संपला असून महाराष्ट्र वाद उकरून काढत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा थेट इशारा त्यांनी दिला.
https://maharashtramaza.online/?p=161542
हुबळी येथील एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर भाष्य केले. कर्नाटकच्यादृष्टीने सीमाप्रश्न हा संपलेला अध्याय आहे.
पण महाराष्ट्र सरकारने सीमावाद पुन्हा उकरून काढू पाहात आहे. सीमाप्रश्न आता सर्वोच्च न्यायालयात आहे. अशा परिस्थितीत जनतेच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लोकांमध्ये सामंजस्य आहे, त्याच वेळी सीमावाद देखील आहे. केले. कर्नाटकच्या मते सीमावाद हा एक बंद अध्याय आहे; परंतु महाराष्ट्राने पुन्हा उकरून काढू नये असा इशारा बसवराज बोम्मई यांनी दिला आहे.



