नवी दिल्ली : भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिसच्या 2500 हून अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक उमेदवारांनी 17 डिसेंबरपूर्वी अर्ज दाखल करणं आवश्यक आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागणार आहे. इच्छुक उमेदवार पश्चिम मध्य रेल्वे रेल्वेच्या wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतात. दहावी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी मिळण्याची उत्तम संधी आहे.
- 2500 हून अधिक पदांवर भरती
या भरतीअंतर्गत एकूण 2521 पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लगेचच अर्ज दाखल करावा. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असून शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- WCR Recruitment 2022 : भरतीसाठी वयाची अट काय?
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2022 आहे. अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 वर्ष ते 24 वर्ष यादरम्यान असणं आवश्क आहे. आरक्षित प्रवर्गाला सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.
WCR Recruitment 2022 : शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. यासह, त्यांच्याकडे संबंधित क्षेत्रातील आयटीआय (ITI) डिप्लोमा (NCVT किंवा SCVT) असणं आवश्यक आहे.




