पुणे – सरकार इलेक्ट्रिक पुढाकार पर्यावरण संतुलनासाठी इलेक्ट्रिक वाहन खरेदीस प्राधान्य देत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन निर्मिती आणि विक्री वाढेल असे टॉर्क मोटर्स या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कपिल शेळके यांनी सांगितले. वाहनाची निर्मिती वाढावी याकरिता घेत आहेत. नागरिक टॉर्क मोटारने भारतातील पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल क्रेटोस सादर केली होती.
आता कंपनीने या वाहनाची विक्री वाढविण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या असून राज्यात अनेक ठिकाणी अनुभव केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. पुण्यात विधी महाविद्यालयाजवळ असे केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना वाहने प्रत्यक्ष पाहता येतील आणि चालविता येतील. त्या आधारावर खरेदी करण्याचा निर्णय घेता येऊ शकणार आहे. टॉर्क मोटारने आपली उत्पादने क्रेटोस आणि क्रेटोस आर जानेवारी महिन्यात दाखल केले आहे. या उत्पादनाला महाराष्ट्रातील विविध शहरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्या आधारावर आगामी काळात उत्पादन क्षमता वाढविण्याच्या शक्यतेवर विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. टॉर्क मोटार्सचे संशोधन आणि विकास केंद्र बळकट आहे. त्यामुळे या कंपनीने आतापर्यंत ५० पेटंटसाठी अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान टॉर्क मोटारने क्रेड आर या कंपनीबरोबर सहकार्य करार केला असून जुनी वाहने घेऊन नवी क्रेटोस खरेदी करण्याची संधी यामुळे ग्राहकांना मिळणार आहे. त्यामुळे तरुणांना जुने वाहन देऊन नवे वाहन घेण्याची संधी मिळेल असे क्रेड आर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिधर नंदीगाम यांनी सांगितले.



