लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०२२-२३ चा गळीत हंगाम राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने यशस्वीपणे चालू केला असून गळितास येणाऱ्या उसाला २८०० रु. प्र. मे. टन ऊस दर जाहीर करण्यात आला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सह. साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना ऊसबिलापोटी पहिला हप्ता प्र. मे. टन २५०० रुपयांप्रमाणे रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर लवकरच वर्ग केली जाणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.
ना. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने आर्थिक नियोजन करुन पहिल्या टप्प्यातील विस्तारवाढ चालू गळीत हंगामापूर्वी केली असून, दुसऱ्या टप्प्याचे काम ही चालू गळीत हंगाम समाप्त झाल्यानंतर करणार आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांचे हित डोळयांसमोर ठेऊन सन २०२२-२३ गळीत हंगाममध्ये कारखान्यास गळितास आलेल्या उसाला २८०० रु. प्र.मे. टन दर जाहिर करण्यात आला आहे.



