टाटा वेगवेगळ्या कारणासाठी सतत चर्चेत येत असतो. आता टाटा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आलाय. टाटाने Apple फोन प्रेमींना एक आनंदाची बातमी दिली आहे. आता टाटा Apple सोबत पार्टनरशिप करत एक मोठा धमाका करणार आहे.
टाटा ग्रुप आता देशात Apple चे एक्सक्लुजीव स्टोर उघडण्याच्या तयारीत आहे. टाटा ग्रुप ने यासाठी मॉल्ससारख्या महागड्या ठिकाणी बोलणी सुरू केली आहे. पण मुळात सर्वसामान्यांचा एकच प्रश्न असणार की आता आयफोन स्वस्त होणार का?
टाटा इनफिनिटी रिटेल ब्रांडसोबत Apple चे 100 आउटलेट उघडण्याच्या तयारीत आहे. इनफिनिटी रिटेल आता टाटा ग्रुपच्या इलेक्ट्रॉनिक चेन क्रोमा स्टोरचे कामकाज पाहते. इनफिनिटी रिटेल Apple चा फ्रँचाएजी पार्टनर बनून 500 पासून ते 600 स्क्वेअर फुटच्या100 आउटलेट उघडण्याच्या तयारीत आहे.स्टोअरबाबत असं बोललं जात आहे की है, स्टोअरमध्ये आयफोन, आयपॅड (iPad) आणि Apple वॉच (Apple Watch) ची विक्री केली जाणार. Apple चे दूसरे फ्लॅग्शिप प्रोडक्टस जसे की मॅकबुकची विक्रीसाठी प्रीमिअम रीसेलर होणे गरजेचे आहे. सोबतच यासाठी स्टोअरचा आकार 1 हजार स्क्वेअर फुटपेक्षा जास्त असणे अपेक्षित आहे. भारतात सध्या Apple चे 160 पेक्षा जास्त प्रीमिअम रीसेलर आहेत.




