
नागपूरमध्ये ‘नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स’ची ७८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अभूतपूर्व गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली आहे. या व्यापारी संस्थेच्या सत्ताधारी आणि विरोधी गटातील सदस्यांनी एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
आज सकाळी नागपूरमध्ये ‘नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स’ची ७८ वी वार्षिक बैठक पार पडली. यावेळी सभेत गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली आहे. अश्विन मेहाडिया यांचा विद्यमान सत्ताधारी गट आणि डिपेन अग्रवाल यांचा विरोधी गट यांच्यात हा राडा झाला आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत.



