
मी प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत”, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. तेली समाजाचा हा कार्यक्रम होता आणि यासाठी मोठ्यासंख्येने ओबीसी प्रवर्गातील नागरिकांची उपस्थिती होती. दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिवाय विरोधकांकडून यावरून भाजपावर
या पार्श्वभूमीवर आज(सोमवार) भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आपल्या विधानाबाबत खुलासा केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमत्री असताना त्यांनी सर्व समाजाला पुढे आणले. २०१९ मध्ये आम्हाला जनतेने कौल दिला होता. म्हणून मी अध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, अशी मी भावना व्यक्त केली असं बावनकुळे यांनी सांगितलं.



