पुणे, दि. २१: सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र उद्योग घटकांना सन २०१८-१९ व २०१९-२० या आर्थिक वर्षाचे औद्योगिक प्रोत्साहनाचे दावे सादर करण्यासाठी डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत पात्रता प्रमाणपत्र घेतलेल्या ज्या उद्योग घटकांनी परिपूर्ण दावे सादर केले नाहीत अशा घटकांनी परिपूर्ण दावे माहे डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.




