
मध्य प्रदेशात भाजपा नेत्याच्या अनधिकृत हॉटेलवर कारवाई करण्यात आली असून पाडण्यात आलं आहे. जगदीश यादव हत्या प्रकरणानंतर भाजपाचे निलंबित नेते मिश्री चंद गुप्ता यांच्याविरोधात यांच्याविरोधात रोष आहे. मिश्री चंद गुप्ता यांच्यावर जगदीश यादव यांची २२ डिसेंबरला अंगावर गाडी घालून हत्या केल्याचा आरोप आहे.
इंदूरमधील विशेष पथकाने मंगळवारी संध्याकाळी ६० डायनाईटचा वापर करत हॉटेल उद्ध्वस्त केलं. यानंतर काही सेकंदातच हॉटेल जमीनदोस्त झालं. जिल्हाधिकारी दीपक आर्या, उपमहानिरीक्षक तरुण नायक आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.




