बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथे त्यांनी आपल्या जुन्या संवंगड्या सोबत वेळ घालवला. त्यातील एकाच्या घरी भेट देत त्यांनी विचारपूस केली. बी जी आता वय किती…. दादा जुना वाडा सोडून बंगल्यात केंव्हा आलात… आण्णा कामगार संघटनेचे काम अजून सुरू आहे का? शरद पवार यांच्या या प्रश्नांनी त्यांचे सवंगडी भारावून गेले.
बी जी आता वय किती आहे, साहेब ८६ वर्ष आहे. यावर पवार म्हणतात, माझ्या पेक्षा ४ वर्षाने जास्त आहे. आता आपल्या वयाची किती शिल्लक आहेत, या भागात? यावर तीन असे उत्तर येते. यावरून एकच हशा पिकला होता. १९६७ सालातील पवार यांच्या खांद्याला खांदा देऊन साथ देणारे निंबुतचे बी जी काकडे, वानेवाडीचे रघुनाथ भोसले व तुकाराम जगताप यांची आज शरद पवार यांनी आवर्जून भेट घेतली आणि तब्बेतीची विचारपूस केली.
त्यानंतर शरद पवार यांनी विद्यार्थ्यांशी साधला. माझ्या संरक्षणमंत्री पदाच्या काळात मुली सैन्यदलात नव्हत्या. सैन्यदलात मुली भरती व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आज मुली सियाचीन सारख्या भागात देशाचे रक्षण करत आहेत. महिलांच्या हाती कारभार दिल्यास देश पुढे जाण्यास वेळ लागणार नसल्याचेही पवार म्हणाले.



