मुंबई – मुंबईच्या कुर्ला परिसरात पतीला डान्सबारमध्ये जाण्यासाठी पैसे न दिल्यामुळे पत्नीची हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी पती सरफराज खान याला नेहरूनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी सरफराज ने शुक्रवारी 6 जानेवारी रोजी दुपारी 2.30 वाजता कुर्ला येथील राहत्या घरी पोहोचला. घरी पोहोचला असता त्याची पत्नी शबीना खान हिच्याकडे त्याने डान्सबारमध्ये जाण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी केली.
लेडीज डान्स बार मध्ये जाण्याकरीता पत्नीने पैसे न दिल्याने पत्नीला शिवीगाळ करून मारहाण करायला सरुवात केलim दोघात वाद विकोपाला गेल्यावर आरोपी पतीने तलवारीने पत्नीच्या डोक्यात हल्ला करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पत्नी शबाना खान यात गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहे. नेहरूनगर पोलीसांनी पिडीत शबानानी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आणि आरोपी पतीला अटक केली.



