मुंबईः मंत्रिपद नाकारुन बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाले. परंतु जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा मात्र बच्चू कडू यांना मंत्रिपदासाठी डावलण्यात आलं. आता सहा महिने उलटून गेले तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, त्यामुळे बच्चू कडू आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
राज्यामध्ये सध्ये २३ मंत्रिपदं रिक्त आहेत. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल, अशी आशा घेऊन अनेकजण बसलेले आहेत. परंतु विस्ताराची तारीख निश्चित होत नाही.
येत्या २१-२२ तारखेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं संजय शिरसाट म्हणाले होते. त्यानंतर बच्चू कडू म्हणाले की, शिरसाट यांना कशी माहिती मिळाली, ते माहिती नाही. परंतु सरकारने विस्तार नसेल करायचा तर करु नये. तसं स्पष्टपणे सांगावं. उगीच खिशातून फूल काढायचं, दाखवायचं आणि पुन्हा ठेवून द्यायचं असं करु नये. विस्तार होणार असेल तर लगेच करावा… एक घाव दोन तुकडे करायला पाहिजेत, असं सगळ्या आमदारांचं मत असल्याचं बच्चू कडू म्हणाले.



