नाशिक : सिनेस्टाइल पाठलाग करीत कारमधून गावठी कट्टे घेऊन जाणाऱ्या तरूणांना शिरपूर तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे तरूण नाशिक येथील कॉलेजचे विद्यार्थी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्याच्याकडून कारसह 3 कट्टे, 6 जिवंत काडतुसह , पावणे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सपोनि सुरेश शिरसाठ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जळगाव सिमेवरील सत्रासेन गावाकडून भोईटे मार्ग शिरपूरकडे काही जण आलिशान गाडीमधून गावठी कट्यांसह शिरपूरच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली होती.
या वर्णनाप्रमाणे भोईटी गावाजवळ MH 15 CT 5688 क्रमांकाची गाडी जाताना निदर्शनास आली. शिरपूर तालुका पोलिसांनी हात देवून वाहनाला थांबविण्याचा इशारा दिला, परंतु वाहनावरील चालकाने पोलिसांना पाहुन गाडी जोराने पळविली. भोईटे गावाच्या शिवारातच पोलिस पथकाच्या वाहनाने ओव्हर टेक करत त्यांचे वाहन अडवले.
शिरपूर तालुका पोलीसांनी पकडलेल्या या कॉलेज तरूणांमध्ये मोहीतराम तेजवानी (वय 21, रा. पलंटनं. 10 विंग गोदावरी कॉम्प्लेक्स चिंचबनरोड पंचवटी, नाशिक), आकाश विलास जाधव, (वय 24 रा. रूम नं. 15 देह मंदिर सोसायटी विसे चोक, गंगापुर रोड नाशिक), राज प्रल्हाद मंदोरिया (वय 21 रा. प्लॉट नं. 6 आजाड निवास मधुबन कॉलनी पंचवटी नाशिक), अजय जेठा बोरीस (वय 29 रा. रूम नं. 6 चैतन्य हौसिंग सोसायटी रामवाडी पंचवटी, नाशिक), निवास सुरेंद्र कानडे, (रा. 24 (ब) दिव्य दर्शन सोसायटी, विसे मळा कॉलेज रोड नाशिक) व दर्शन चमनलाल सिधी (वय 21 रा. अजंदे बुद्रुक ता. शिरपुर) यांचा समावेश आहे.



