मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाकडून एमपीएससी परीक्षेच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या बदलांविरोधात विद्यार्थी आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी याविरोधात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येत आंदोलन देखील केले होते. यावर आज ज्येष्ठ नेते शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
शरद पवार यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून त्यांचा विद्यार्थ्यांचा प्रश्न समोपचाराने मिटवू. वेळ काढून मला सांगा. याबद्दल सह्याद्रीवर मिटींग ठेवा. मी विद्यार्थ्यांचे पाच प्रतिनिधी बोलवतो. तुमच्या जे कोणी असतील त्यांना बोलवा असे शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगितले.
एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होणार भेट होणार आहे. आज याच संदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी फोन वरून चर्चा केली असल्याची माहिती कॅांग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे, शरद पवार, अतूल लोंढे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित असणार आहेत. असेही त्यांनी सांगितले.



