पुणे : पुणे शहरात जी ट्वेंटी अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी रंग रंगोटी सुरू आहे. जी २० या जागतिक परिषद सध्या पुण्यात सुरू आहे. यानिमित्ताने जगभारातले मान्यवर पुण्यात येऊन जागतिक पातळीवरच्या प्रश्नांविषयी चर्चा करत आहेत. दरम्यान G20 आलेल्या परदेशी पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली आहे.
मात्र या तात्पुरत्या सजावटीवरून पुणेकरांनी महानगरपालिकेला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. पुण्यातील एसबी रोड या परिषदेसाठी खास सजवण्यात आला आहे. यावर तांबडे बाबा नावाच्या यूजरने खास मीम बनवली आहे. पुणे शहरातील सजावटींवर पुणेकरांनी अनेक मीम्स सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत .
वापरकर्त्यांनी मनपाकडून शेवटच्या क्षणी करण्यात आलेल्या परिषदेच्या तयारीवर देखील निशाणा साधला आहे. पुणे शहरातील रस्ते परिषदेसाठी दुरुस्त करणाऱ्या मनपावर वापरकर्त्यांनी सुनावलं आहे. पुण्यातील जी-२० परिषदेची ठिकाणे आणि इतर पुणे याकडे पाहण्याचा पालिकेचा दृष्टीकोण देखील वापरकर्त्यांनी दाखवून दिला आहे. पुण्यात आलेल्या परदेशी पाहुण्यांसाठी कुठलेतरी दुसरेच पुणे दाखवण्याच्या प्रयत्नावर देखील मीमच्या माध्यमातून बोट ठेवण्यात आलं आहे.




