उंब्रज ; मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त उंब्रज (ता. कराड) येथील श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानतर्फे आज रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजित करण्यात आले होते त्याचे उदघाटन पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.
यावेळी त्यांनी या शिबिराचा आढावा घेऊन उपस्थितांशी सुसंवाद साधला. मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. उंब्रज येथे रक्तदान आणि आरोग्य शिबिर आयोजित करून रचनात्मक कामाचा आदर्श घालून दिल्याबद्दल श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे यावेळी अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सातारा विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते-शिवसैनिक, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



