मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे कौतुक केले. निवडणूक आयोगाने ‘दूध का दूध, पानी का पानी’ केले. सत्यमेव जयतेचा फॉर्म्युला कालच अंमलात आणला आहे, असे अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोमणा मारला होता. दरम्यान उत्तर भारतीयांच्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी अमित शाहांवर पलटवार केला आहे.
निवडणूक आयोगाने शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून उद्धव गटात नाराजी आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची भाषा ठाकरे यांनी केली आहे.
अमित शाहांच्या टोमण्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “अजून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बाकी आहे. दूध का दूध, पानी का पानी झाले नाही तर तुम्ही दुधात मिठ टाकले आहे. मात्र त्याला आम्हाला सुधारायचे आहे. त्या दुधात साखर टाकायला मला तुमची (उत्तर भारतीय) साथ पाहीजे.”



