पुणे, दि. 2 – राज्यातील कॅंटोन्मेंट निवडणुकांचे बिगूल वाजले असून, येत्या 30 एप्रिल रोजी या निवडणुका होणार आहेत. यासाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली असून, भाजपने यासाठीच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील निवडणूक प्रमुखांची घोषणा केली आहे. पुणे कॅंटोन्मेंटसाठी सुनील कांबळे, खडकी कॅंटोन्मेंटसाठी सिद्धार्थ शिरोळे, देहू कॅंटोन्मेंटसाठी माजी आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय नाशिक येथील देवळालीसाठी बाळासाहेब सानप, अहमदनगर येथे महेंद्र गंधे, छत्रपती संभाजीनगर येथे संजय केनेकर आणि नागपूर येथे डॉ. राजीव पोतदार यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांआधी कॅंटोन्मेंटच्या निवडणुका होणार आहेत. त्यातून पुण्यामध्ये दोन कॅंटोन्मेंट भाग येतात, हा भागही खूप मोठा आहे. त्यामुळे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पराजयाचा फटका याठिकाणी बसू नये, यासाठी प्रयत्न केले जातील का हे पहावे लागेल.



