मुंबई : आपण लोकांना नेहमी असं बोलताना ऐकतो की पत्रिका जुळली नाही म्हणून लग्न मोडलं किंवा पत्रिकेतील कमी गुण जुळले असं म्हणतो. काही जोडप्यांचे तर ३६ गुण मिळले असं देखील म्हटलं जातं. लोकांच्या मान्यतेप्रमाणे ज्या जोडप्यांचे ३६ गुण मिळतात अशी जोडपी भविष्यात चांगला संसार करु शकतात. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की हे ३६ गुण म्हणजे नक्की असतं तरी काय?
तर चला आपण ते समजून घेऊ.
ज्योतिषशास्त्रानुसार नाडीचे 8 गुण, भकूटचे 7 गुण, गण मैत्रीचे 6 गुण, ग्रह मैत्रीचे 5 गुण, योनी मैत्रीचे 4 गुण, नक्षत्राचे 3 गुण, वास्यचे 2 गुण आणि वर्णाचा 1 गुण अशा प्रकारे एकूण 36 गुण असतात.
लग्नानंतर वधू-वराचे संबंध एकमेकांशी मैत्रीपूर्ण असावेत, संतती असावी, सुख-संपत्तीत वृद्धी व्हावी, दीर्घायुष्य लाभावे, यासाठी वधूपक्ष आणि वरपक्ष या दोघांकडून त्यांचे किती गुण जुळतात, हे पाहिले जाते. ‘मुहूर्तचिंतामणी अष्टकूट’ या ग्रंथात वर्ण, वास्य, नक्षत्र, योनी, ग्रह मैत्री, गण, भकूट आणि नाडी यांचा समावेश आहे.
मानलं जातं. एकूण 36 गुणांपैकी 18 ते 21 गुण आढळल्यास गुणमेलन मध्यम मानलं जातं. यापेक्षा जास्त जुळले, तर त्याला शुभ विवाह मिलन म्हणतात. कोणत्याही वधू-वराचे 36 गुण जुळणं अत्यंत दुर्मिळ मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीराम आणि माता सीतेचे 36 गुण जुळले होते.




