मुंबई : मनसेचे नेते, माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर शिवाजी पार्क येथे हल्ला झाला. हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावू आले होते. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. हल्ल्यात देशपांडे जखमी झाले आहेत. त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
संदीप देशपांडे हे आज नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला शिवाजी पार्कात आले होते. यावेळी मॉर्निंग वॉक करत असतानाच अचानक काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना रॉड आणि स्टम्पने बेदम मारहाण करण्यात आली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संदीप देशपांडे प्रतिकार करू शकले नाही. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे देशपांडे जखमी होऊन खाली कोसळले. देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांनी देशपांडे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हल्लेखोर पसार झाले.
मास्क लावून आले
काही हल्लेखोर तोंडावर मास्क लावून आले होते. या हल्लेखोरांनी देशपांडे यांच्यावर हल्ला करून तिथून पळ काढला. जखमी अवस्थेतील देशपांडे यांना तात्काळ हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर मनसेचे नेते, पदाधिकारी आणी कार्यकर्ते तात्काळ हिंदुजा रुग्णालयात पोहोचले आहेत.
गर्दी असूनही हल्ला…
पहाटे शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉकला बरीच गर्दी असते. लोक योगा आणि मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. एवढ्या गर्दीच्या ठिकाणी देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. देशपांडे हे आपल्या रोखठोक राजकीय मतांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या राजकीय स्टेटमेंटमुळे ते नेहमीच वादात असतात. त्यामुळे त्यांच्या हल्ल्यामागे काही राजकीय धागेदोरे आहेत का? याचा शोध पोलीस घेत आहेत.
अशा हल्ल्यांना मी घाबरणार नाही. मी माझं काम करत राहील. ज्यांना वाटतं मी या हल्ल्याने घाबरेल त्यांना मी स्पष्टपणे सांगतो की, याने मी घाबरणार नाही,” असं संदीप देशपांडेंनी नमूद केलं



