कोल्हापूर : करोनामुळे जोतिबा यात्रेवर निर्बंध लादले होते. यावर्षी जोतिबा यात्रेवर निर्बंध नसल्याने यात्रेत सहा ते सात लाख भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे. दख्खनचा राजा जोतिबाची यात्रा ६ एप्रिल रोजी होणार असून यात्रा काळात भाविकांची संख्या वाढणार आहे.
यंदा यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येतील. या यात्रेसाठी भाविकांकरीता कोणतेही निर्बंध नसतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले असून गर्दीमुळे भाविकांची गैरसोय होऊ नयेत यासाठी उपाय योजना करण्यात येणार आहेत. यात्रेदरम्यान रस्त्यावर असणारी अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यात्रेसाठी कार्यरत असणारे मंदीर व्यवस्थापन, स्टॉलधारक, संबंधित कर्मचारी, ठेकेदार यांच्यावर नियंत्रण ठेवत नियोजन करण्यात आले आहे.
त्याचबरोबर यात्रेस खाद्य पदार्थांचे स्टॉल लावणाऱ्या स्टॉलधारकांनी अन्न औषध प्रशासन विभागाची परवानगी घ्यावी घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री यांनी केली आहे. एसटी, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, एम.एस.ई.बी. अन्न औषध प्रशासन विभागासह इतर विभागाचा आढावा घेतला जाईल.
ज्योतिबाच्या मेळ्याची गोष्ट
कोल्हासूरचा पराभव केल्यावर देवी लक्ष्मी कोल्हापुरात स्थायिक झाली आणि चारही दिशांना चार पहारेकरी नेमले, अशी आख्यायिका आहे. दक्षिण दिशेचे रक्षण करणारे भगवान ज्योतिबा. आणखी एक आख्यायिका अशी आहे की ज्योतिबा हा केदारनाथचा अवतार मानला जातो, ज्याने रत्नासुर राक्षसाचा वध केला होता. सासन काठी हे राक्षसाच्या पत्नीच्या मुक्तीचे प्रतीक आहे. ज्योतिबा हे भगवान शिवाचे रूप आहेत अशी सर्वात सामान्य समजूत आहे. ज्योतिबा हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे एकत्रित रूप आहे, अशी समजूत आहे.



