नवी दिल्ली : मोदी आडनावारून केलेल्या वक्तव्यानंतर काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी मानहानी प्रकरणात दोषी ठरवले होते. तसेच त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आज राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. यावरून आता देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनीही यासंदर्भात पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या मी भारतासाठी लढतो आहे आणि मी त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे, असे ते म्हणाले.
मैं भारत की आवाज़ के लिए लड़ रहा हूं।
मैं हर कीमत चुकाने को तैयार हूं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 24, 2023
- राहुल गांधींवरील कारवाईवरून काँग्रेस आक्रमक…
दरम्यान, राहुल गांधींवरील कारवाईनंतर काँग्रेस नेते आक्रमक झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या कारवाईवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “राहुल गांधी सत्य मांडत होते आणि मांडत राहणार. हे त्यांना पचत नाही. त्यामुळे राहुल गांधींवर समस्या संपतील असं त्यांना वाटत असेल. पण, त्यांच्या समस्या संपणार नाहीत. आम्ही जेपीसीची मागणी करत राहू. लढत राहू… लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला जेलमध्ये जावे लागलं तरी तयार आहोत,” असे ते म्हणाले.




