कोल्हापूर -जोतिबा डोंगर येथे ५ एप्रिल रोजी होणार आहे यात्रा काळात महाराष्ट्रासह ,आंध्र प्रदेश ,कर्नाटक तसेच विवीध राज्यातुन लाखोंच्या संखेने येतात.या यात्रा काळात बाहेरील व्यापारी येऊन त्याची ही तयारीची लगबग चालू आहे.कोरोना काळानंतर यावर्षि मोठ्यां प्रमाणात भरणार असून यात्रा काळात सासनकाट्याही मिरवणूकीत दाखल होणार आहेत.
जोतिबा यात्रेत जवळपास शंभरच्या आसपास सासनकाठ्यां मिरवणूकीत सामील होणार असून सासनकाठीचा पहीला मान सातारा जिल्हयातील नागठाणे येथील पाडळी या गावाला मिळाला आहे. यावर्षी प्रथमच पाडळी गावच्या लोकांनी लोकवर्ग्ंणीतून सासनकाठीला सोन्याच्या पादुका तयार केल्या आहेत.
त्यामुळे ही सासनकाठी सोन्याच्या प्रकाशात चमकणार आहे. तसेच या सासन काठीला अडीच लाख किमतीचा रेशमी पोशाख ही तयार करून घेतला आहे. यंदा मानाची पहिली सासनकाठी जोतिबाच्या सासनकाठीच्या मिरवणूकीत मोठे आकर्षण ठरणार आहे.



