पुणे : महाराष्ट्र कारागृह विभागातील ज्येष्ठ अधिकारी यु.टी. पवार यांची नुकतीच डी.आय.जी. पदावर (औरंगाबाद) संभाजीनगर येथे पदोन्नती झाली आहे. श्री पवार हे 1998 पासून कारागृह विभागात उपअधीक्षक ते डीआयजी पदापर्यंत कायमच आपल्या कार्यपद्धती व कर्तव्यनिष्ठेमुळे चर्चेत राहिले.
कारागृहाच्या शासकीय जागेवरील अतिक्रमण असो किंवा मोठमोठ्या अंडरवर्ल्ड, गँगस्टर आरोपी यांचा कर्दनकाळ ठरलेले आहेत. कोरोना महामारीच्या त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी देण्याचे काम केले. कोरोना काळात आपले सर्व सहकारी स्टाफ सहित दोन वेळा 21 दिवसांसाठी स्वतःला कारागृहात विलगीकरण करून ठेवले होते.
कठोर प्रशासक, शिस्तप्रिय अधिकारी आणि गरीब कैदी व सहकारी कर्मचारी यांच्या बाबतीत सहिष्णू अशा विविध भूमिका फार कौशल्याने पार पाडल्या. येरवडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यासाठी अनेक कल्याणकारी उपक्रम त्यांनी राबविले. आपल्या कार्यपद्धतीमुळे कायमच चर्चेत राहिलेलेे यु.टी. पवार यांच्या लक्षवेधी कारकीर्दीमुळे त्यांना डीआयजी पदा वरती पदोन्नती देण्यात आली. ही जबाबदारी देखील उत्तमपणे पार पाडतील अशी अपेक्षा सामान्य नागरिकांना आहे.



