वाशीम : सैनिक सेवेत महिलांचा टक्का कमी आहे. मुलींसाठी हे अवघड क्षेत्र समजले जाते. परंतु, याला फाटा देत आता मुलीदेखील सैनिक सेवेकडे वळू लागल्या आहेत.
तालुक्यातील काजळांबा येथील शेतकरी कुटुंबातील मनीषा राजकुमार उगले या २० वर्षीय तरुणीची पहिल्याच प्रयत्नात इंडियन नेव्हीमध्ये निवड झाली आहे. ती जिल्ह्यातील पहिली महिला अग्निविर ठरली असून, तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.



