आपल्या डान्समुळे राज्यभर चर्चेत असणारं गौतमी पाटीलचे राज्यभरात असंख्य चाहते आहेत, पण तिच्या काही डान्स व्हिडीओंनंतर तिच्यावर अश्लील डान्स करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे तिला माफीही मागावी लागली, तसेच लोकांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं. पण तिने त्यात आपण सुधारणा केली असल्याचं तिने म्हटलं होतं.
गौतमी तिच्या डान्ससह वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिची कौटुंबीक पार्श्वभूमी, तिचं शिक्षण, तिचे पालक या गोष्टींबद्दल तिच्या चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता असते. अशातच आपल्याला जबाबदाऱ्या उचलणारा आणि समजून घेणारा मुलगा हवा आहे, असं तिने ‘दॅट ऑड इंजिनिअर’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. या मुलाखतीत तिने आयुष्यातील कठीण प्रसंगाचा खुलासा केला.
गौतमीने तिचा आवडता खाद्यपदार्थ, फिरायला कुठे जायला आवडतं, अशा आवडी-निवडीबद्दल सांगितलं. तिला पुरणपोळी खायला खूप आवडते आणि फिरण्यासाठी समुद्रकिनारे आवडतात, असं गौतमीने सांगितलं. यावेळी तिला रॅपिड फायरमध्ये एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, असा प्रश्न विचारण्यात आला. तिला दोन्हीपैकी एक नाव निवडायचं होतं. पण तिने त्यावर उत्तर देणं टाळलं. तसेच ‘तू मला मार खायला लावणार की तू माझा मार खाणार’, असं ती हसत अँकरला म्हणाली.



