ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला शिंदे गटाकडून मारहाण झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. यानंतर फडणवीसांनीही ठाकरेंवर हल्लाबोल केला. यात त्यांनी फडतूसपासून लाळघोटेपणापर्यंत प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर दिलं. ते मंगळवारी (४ एप्रिल) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
फडणवीस नेमकं काय म्हणाले त्याचा हा आढावा…
अडीच वर्षांचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमकं फडतूस कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे . माझा प्रश्न असा आहे की, दोन-दोन मंत्री तुरुंगात गेल्यावर त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत दाखवत नाहीत, त्या मंत्र्यांभोवती लाळघोटत असतात अशा मुख्यमंत्र्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे, जे वाझेच्या मागे लाळ घोटतात त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे, ज्यांच्या काळात पोलीस खंडणी वसूल करतात त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे. अडीच वर्षे घरी बसून काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला राजकारण शिकवू नये – देवेंद्र फडणवीस
आमचं तोंड उघडलं तर त्यांना पळता भुई थोडी होईल
आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत. याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असा नाही
ज्या दिवशी बोलणं सुरू करेन त्या दिवशी त्यांना पळता भुई थोडी होईल. त्यामुळे त्यांनी संयमाने बोलावं
त्यांचा थयथयाट आणि निराशेला उत्तर देण्याचं कारण नाही
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदींचा फोटो लावून निवडून येतात आणि त्यानंतर विरोधकांची लाळ घोटतात
फक्त खुर्चीसाठी ते लाळघोटेपणा करतात. मग खरा फडतूस कोण? याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे
ते जितक्या भाषेत बोलले, त्यापेक्षा खालच्या पातळीची भाषा मला येते. मी नागपूरचा आहे
मात्र, मी तसं बोलणार नाही. कारण तसं बोलण्याची माझी पद्धत नाही
या निमित्ताने मी एवढंच सांगतो की, याचं उत्तर त्यांना जनता देईल
मी ५ वर्ष गृहमंत्री राहिलो आहे, आता पुन्हा आहे
मला याची जाणीव आहे की, मी पुन्हा गृहमंत्री झाल्यापासून अनेक लोक देव पाण्यात ठेऊन बसले आहेत, की मला गृहमंत्रीपद सोडावे लागेल
मात्र, मी तुमच्या मेहनतीने नाही, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारमध्ये गृहमंत्री आहे
जो-जो चुकीचे काम करेल, मी त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही
राज्यात कुठेही कोणतीही अनुचित घटना घडली तर त्याची निष्पक्ष चौकशी करण्यात येईल. पण, त्याआड राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर ते योग्य ठरणार नाही
चाणक्य एकदा असे म्हणाले होते की, राज्यातील चोर, डाकू, लुटेरु
मी राजा नाही, पण तरीही देखील चाणक्य जे म्हणाले तेच आता खरे होताना दिसते आहे – देवेंद्र फडणवीस



