खालापूर – कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात सध्या इनकमिंग सुरू असल्याने ठाकरे गट सेनेतील शिवसैनिकांमध्ये उत्साह असताना 4 एप्रिल रोजी तांबाटी वाडी गावातील शिंदे गटातील शुभम विलास सावंत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात सहसंपर्कप्रमुख भाई शिंदे, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला असून हा पक्षप्रवेश शिवसैनिक अविनाश आमले यांच्या पुढाकाराने पार् पडल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
तर पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख भाई शिंदे, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, युवासेना तालुका अधिकारी महेश पाटील, उपतालुकाप्रमुख अशोक मरागजे, विभागप्रमुख दीपक मालुसरे, राजेश मेहेतर, संगम जाधव, अविनाश आमले, आनंद बलकवडे, हरिचंद्र सावंत ,एकनाथ सावंत, अशोक बामणे, दीपक राणे, प्रणाल लाले, दामोदर सावंत, संतोष दळवी, मनोहर राणे प्रमुखासह मोठ्या संख्येने शिवसैनिक – युवासैनिक उपस्थित होते.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, सहसंपर्कप्रमुख भाई शिंदे, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली व शिवसैनिक अविनाश आमले यांच्या पुढाकाराखाली खालापूर तालुक्यातील तांबाटी वाडी गावातील शिंदे गटातील शुभम विलास सावंत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात शिवसेना पक्षाच्या कर्जत विधानसभा मध्यवर्ती शिवालय कार्यालयात पक्षप्रवेश केला आहे.


