
अलीकडेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या राजकीय भवितव्याबद्दल अंजली दमानिया यांनी मोठा गौप्यस्फोट केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे गटातील १५ आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार काही आमदारांना घेऊन भाजपाबरोबर सत्ता स्थापन करतील, असा दावा अंजली दमानिया यांनी ट्वीटद्वारे केला.
दमानिया यांच्या ट्वीटनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, बुधवारी अजित पवारांनाही याबाबत उत्तर देणं टाळलं आहे. “एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा लहान कार्यकर्ता काय बोलणार?” असं विधान करत अजित पवारांनी थेट उत्तर देणं टाळलं आहे. त्यामुळे अजित पवार भाजपाबरोबर जाणार की नाही? याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.



