
भंडारा : मी सावरकर नव्हे, राहुल गांधी आहे. हा गुन्हा होत असेल तर हा गुन्हा मी वारंवार करत राहणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांचा अपमान केला. त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली काय, महाराष्ट्राचे आधीचे काळी टोपीवाले राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीआई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलाय त्यांनी माफी मागितली काय? जर भाजपात धमक असेल तर महाराष्ट्रात राहुल गांधींच्या केसाला सुद्धा हात लावून दाखवा असे खुले आवाहन काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला. ते भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे पत्रकारांशी बोलत होते.
भाजपासोबत जाणे हा राष्ट्रवादीचा विषय आहे, मात्र काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते भाजपासोबत जात असतील तर त्यांच्यावर कारवाई नक्कीच होईल असा सूचक इशाराही नाना पटोले यांचा काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांना यावेळी दिला. भंडारा-गोंदिया बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या युतीमुळे अजित पवार आणि नाना पटोले यांच्यामध्ये खडाजंगी झाली होती.
मात्र अमरावतीमधील वरूड बाजार समितीत भाजप आणि काँग्रेसची युती झालेली आहे. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजपासोबत जाणे हा राष्ट्रवादीचा विषय आहे. मात्र काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते भाजपसोबत जात असतील तर त्यांच्यावर कारवाई नक्कीच होईल, असा इशारा नाना पटोले यांनी काँगेस कार्यकर्त्यांना दिला.



