
रितेश देशमुख-जिनिलीया देशमुखचा वेड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार हिट ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. नुकतंच रितेशने त्याच्या कुटुंबाबद्दल भाष्य केले.
रितेश देशमुखने नुकंतच ‘मुंबई तक’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने वेड चित्रपट, जिनिलिया, विलासराव देशमुख यांच्यासह विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी रितेश देशमुखला घरात तुझे टीकाकार कोण? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर त्याने “माझ्या घरात माझे सर्वात मोठे टीकाकार हे माझे दोन्हीही भाऊ आहेत.



