नवी दिल्ली : देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे तिमाही निकाल हाती आले आहेत. या कंपनीने बक्कळ कमाई केली आहे. या कंपनीला जवळपास 57 कोटी रुपयांचा शुद्ध नफा झाला. त्यामुळे इन्फोसिसने शेअरधारकांना 17.50 रुपये प्रति शेअर लाभांश देण्याची घोषणा केली.
या घोषणेमुळे इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नीला कोट्यवधींचा फायदा झाला. आश्चर्याचा धक्का बसला ना, तर ऋषी सुनक यांच्या पत्नी, अक्षता मूर्ती सुनक ही इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. इन्फोसिसमधून मूर्ती परिवार आणि त्यांच्या मुलीला कितीचा फायदा झाला.



