मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या माध्यमातून राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांचे सह्याचे पत्र तयार केले असल्याचीही माहिती समोर येत आहे. हे सर्व सुरु असतं आता दुसरीकडे अजित पवार यांनी आज सकाळपासून त्यांच्या सर्वच सोशलमीडिया हँडलवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले वॉलपेपर डिलीट केले आहे. त्यामुळे त्यांनी हा एक सूचक इशारा दिला असल्याचे म्हटले जात आहे.
https://twitter.com/AjitPawarSpeaks?t=WxixxGJ1oOs3DasiUPWQ4Q&s=09
अजित पवार यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर वॉलपेपर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार यांचा फोटो होता. ते फोटो डिलिट केले आहे. त्यामध्ये वॉलपेपर अपलोड केल्यानंतर होणाऱ्या पोस्टसुद्धा डिलिट केल्या आहेत. त्यामुळे अजित पवार पुन्हा एकदा बंड करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याच्या चर्चा सुरू होत्या. भाजप सह शिवसेनेतील अनेक नेत्यांनी अजित पवार अस्वस्थ असल्याचं बोलून दाखवलं होतं. त्यामुळे अजित पवार कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्राने अजित पवार हे 40 आमदारांसोबत भाजपासोबत जाऊन सरकार स्थापन करतील अशी चर्चा सुरू आहे. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाकडून सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपकडून बी प्लॅन तयार केला जात असल्याचे बोलले जात आहे.



