मुंबई ; महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेत प्रत्येक पक्षाचे दोन लोक बोलणार असे ठरले आहे. त्यादिवशी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात पण बोलले नाही. त्यांना कोणाही याबाबत विचारले नसल्याचे अजित पवार म्हणाले. आम्ही नागपूरमध्ये ठरवले होते की, तिथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अनिल देशमुख बोलणार आहेत. छत्रपती संभाजीनंगरमध्ये मी आणि धनंजय मुंडे बोललो.
आता 1 मे ला मुंबईत महाविकास आघाडीची सभा होत आहे. त्या सभेत कोण बोलणार ते देखील आम्ही ठरवू असे अजित पवार म्हणाले. आमच्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आमचे नेते मजबूत आहेत. चुकीच्या बातम्या दिल्यामुळं मित्रपक्षही नाराज होतात असे अजित पवार म्हणाले. या सर्व चर्चांणा आता पूर्णविराम द्या. या चर्चा थांबवा असेही अजित पवार म्हणाले.
अजित पवार हे सहकारी आमदारांसह राष्ट्रवादीला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेले आठवडाभर राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यातच गेल्या चार-पाच दिवसांत दोनदा ते संपर्कात नसल्याने संशय बळावला होता. तसेच पवार यांनी मंगळवारी आमदारांची बैठक बोलावल्याची चर्चा होती. या पाश्वर्भूमीवर आपली भूमिका स्पष्ट करताना अजित पवार यांनी राष्ट्रवादीतच कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले.



