
राज्य मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कमालीची अनिश्चितता असताना रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात रिपाइंला स्थान मिळावं, अशी मागणी केली आहे.
रामदास आठवले यांनी नुकतीच जनसत्ताला एक मुलाखत दिली असून त्यामध्ये विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बाबतीत आपण समाधानी असल्याचं मत मांडलं आहे.
“नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसींचे अनेक मंत्री आहेत. मोदींनी सर्व वर्गांना न्याय देण्याचं काम केलं आहे”, असं म्हणत रामदास आठवलेंनी काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या काळातली आठवण सांगितली.



