मुंबई राज्यातील 16 आमदारांच्या निकाल केव्हाही येण्याची शक्यता असल्यामुळे राज्यातील सरकार कोसळणार का याची चर्चा सुरू आहे असे असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवसांच्या सुट्टीवर गेल्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
मुख्यमंत्री शिंदे सुट्टीवर का गेले आहेत? त्यामागील कोणते कारण आहे? अशा अनेक प्रश्नावरून राज्यात तर कविता लढवली जात आहेत एकनाथ शिंदे यांनी आपल्या शक्ती बाबत अधिकृत माहिती दिलेली नाही मात्र महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्री सुट्टीवर जाण्याची पहिलीच वेळ असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 ते 26 एप्रिल दरम्यान सुट्टीवर असल्याचे समजते.
राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टात चालू आहे. तो अंतिम टप्प्यात असून केव्हाही निकाल शिंदे यांच्या विरोधात लागू शकतो, अशी परिस्थिती असल्याने शिंदे देव देवतांना साकडे घालणार असल्याचे माहिती अंतर्गत सूत्राकडून समजते. राजकीय कलहातून थोडी विश्रांती म्हणून ही त्यांनी या सुट्टीचा मार्ग अवलंबला असेल. तर दुसरीकडे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 14 जणांचे उष्माघातांना मृत्यू झाला. याप्रकारात विरोधक आक्रमक झाल्यामुळे ते अचानक सुट्टीवरही गेले असतील अशाही चर्चांना उधाण आहे.



